२२, २३, २६,२७, २८, ३० ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२२, २३, २६,२७, २८, ३० ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात

Share This
मुंबई - गुंदवली ते कापूरबावडी भूमिगत जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे तानसा, वैतरण आणि उर्ध्व वैतरणा या जलवाहिन्यांवर काम करण्यात येणार आहे. परिणामी दिनांक २२ व २३ ऑगस्ट, २०१६, दिनांक २६,२७ व २८ ऑगस्ट आणि दिनांक ३० ऑगस्ट, ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर, २०१६ या दिवशी संपूर्ण मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येणार आहे.

मुंबईतील पाणीपुरवठ्यामध्ये २० टक्के कपात जाहीर करण्यात येत आहे. तसेच पाणी वितरणाच्या टोकाकडील भागात, उंचावरील विभागात व शहर विभागातील थेट पाणी पुरवठा होत असलेल्या इमारतींमध्ये पाण्याचा दाब कमी असल्यामुळे थोडा जास्त परिणाम जाणवेल. तरी मुंबईमधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशीच पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी काटकसरीने वापरुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages