उना अत्याचारप्रकरणी प्रवीण तोगडिया यांना अटक करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

उना अत्याचारप्रकरणी प्रवीण तोगडिया यांना अटक करा

Share This
रुखी समाजाची आझाद मैदानात निदर्शने
मुंबई / प्रतिनिधी 12 Aug 2016
गुजरातमध्ये मेलेल्या गाईची कातडी काढणाऱ्या दलीत (रुखी) समाजातील चार युवकांंवरील अमानुष अत्याचारामागे विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगाडिया यांचे डोक असून दलीत समाजास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरोखर न्याय द्यायची इच्छा असेल तर त्यांनी तोगडिया यांना अटक करावी, अशी मागणी भारिप बहुजन पक्षाचे नेते व माजी खासदार अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. शुक्रवारी आझाद मैदानात मुंबईतील रुखी समुदायाच्या हजारो लोकांनी गुजरात सरकार, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात तीव्र निदर्शने केली.

काही वेळात चाळीस युवक दोन गाड्या घेऊन सामानसह येतात आणि अत्याचारास सुरुवात करातात, हा योगायोना नसून षडयंत्राचा भाग आहे. हा कट राजकोट येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राज्य मुख्यालयात शिजला होता असा दावा आंबेडकर यांनी केला. गोरक्षकांना जशी हाती लाठी घेता येते, तशी दलितांना पण घेता येते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला

निदर्शनामध्ये सीपीआय, सीपीएम, भारिप, संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते तसेच मुंबईतील शेकडो सफाई कामगार सहभागी झाले होते. व्यासपीठावर सीपीएम नेते अशोक ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड, उल्का महाजन, गुजरातमधील सीपीएम नेते अरुण मेहता, माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे, दलित मुस्लीम सुरक्षा महासंघाचे अध्यक्ष शेख झाकीर हुसेन, ऊर्दू लेखक रेहमान अब्बास, रिपब्लीकन पँथर्सचे सुधीर ढवळे आदी उपस्थित होते. 

अहमदाबादहून निघालेली दलित समाजाची रॅली उना येथे १५ आॅगस्टला पोचणार असून त्यात मुंबइर्तील रुखी समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय यावेळी केला. बासकाठी, पाटणवाडा, सौराष्ट्र, दोतोर, कंडीप्रांत, पंच्यांशी इत्यादी रुखी समाजाच्या संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांचा आझाद मैदानात झालेल्या निदर्शकांमध्ये मुख्यत्वे भरणा होता. निदर्शनातील आझाद मैदानातील भाषणे गुजरातीमधून झाली. यावेळी मोदी, संघ आणि भाजपवर सडकून टिका करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages