आॅगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत गॅस्ट्रोचे २०० रुग्ण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आॅगस्टच्या पहिल्या पाच दिवसांत गॅस्ट्रोचे २०० रुग्ण

Share This
मुंबई : आजारांमुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारांपेक्षा दूषित पाणी आणि अन्नामुळे होणारे आजार तसेच साथीचे आजार यंदा वाढलेले दिसून येत आहे. १ ते ५ आॅगस्ट दरम्यान आढळलेल्या रुग्णांमध्येही दूषित पाणी आणि अन्नामुळे झालेल्या आजारांचे रुग्ण अधिक प्रमाणात आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. 

पावसाळा सुरू झाल्यावर काही भागात दूषित पाणी येते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून प्या, असे आवाहन मुंबईकरांना महापालिकेतर्फे करण्यात आले होते. पण तरीही दूषित पाणी किंवा अन्नामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत वाढ दिसून आली आहे. पाच दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे तब्बल २०० रुग्ण आढळून आले आहेत. हेपिटायटिसचे (ए, ई) १८ रुग्ण आढळून आले आहेत, तर टायफॉइडचे ५९ रुग्ण आढळून आले आहेत. या आजारांना टाळता येणे सहज शक्य आहे. पण या उपायांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे रुग्ण वाढत आहेत. पावसाळ्यात योग्य ती काळजी घ्या आणि आजार टाळा, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डासांमुळे होणाऱ्या आजारातही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे १५४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी काही प्रमाणात स्वाइन फ्लूने मुंबईत डोके वर काढले होते. आॅगस्ट महिन्यात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्याचवेळी पाच दिवसांत लेप्टोस्पायरोसिसचे ५६ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. मलेरियाचे १०० रुग्ण आढळून आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages