अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असे कधीही बोललो नव्हतो - शरद पवारांचे घूमजाव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असे कधीही बोललो नव्हतो - शरद पवारांचे घूमजाव

Share This
मुंबई, दि. 30 - कोपर्डी बलात्कारप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत फेरविचार करून हा कायदा रद्द करावा, असे केलेल्या वक्तव्यावरून काही तासांमध्येच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घूमजाव केला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, असे कधीही बोललो नसल्याचे पवारांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करू नका, पण कोणत्याही कायद्याचा गैरवापरही होता कामा नये, असे मत पवारांनी मांडलं आहे. दलितांनी कधीही अ‍ॅट्रॉसिटीचा गैरवापर केला नाही. उलट दोन सवर्णांच्या भांडणात दलित तरुणांचा वापर करून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. हा गैरवापर होऊ नये एवढेच आपल्याला म्हणायचे होते. हा कायदा रद्द करावा, असे कधीही बोललो नसल्याचे यावेळी शरद पवारांनी अधोरेखित केले. आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला, असे सांगत पवार यांनी सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages