मुंबई / अजेयकुमार जाधव 22 Aug 2016
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील श्रीमंत अश्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्व प्रभागांची पुनर्रचना व आरक्षणा संदर्भातील कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडनुक आयोगाने घोषित केली आहे. तसे पत्र राज्य निवडनुक आयोगाचे अवर सचिव नि. व. वागले यांनी काढले आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक फेब्रुवारी 2017 मधे होत आहे. निवडणुकीपूर्वी प्रभाग रचनांची पुनर्रचना आणि अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्ग प्रभागांबाबत 9 सप्टेंबरला प्रस्ताव तयार केला जाणार आहे. हा प्रस्ताव 16 सप्टेंबरला कोकण आयुक्त, जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना सादर केल्यावर आरक्षबाबत बैठक होणार आहे. 23 सप्टेंबर ला या प्रस्तावाला निवडनुक आयोग मान्यता देणार असून 27 सप्टेंबरला मागासवर्ग व महिला प्रभागाचे आरक्षण काढण्यासाठी जाहिर नोटिस प्रसिद्ध केली जाणार आहे.
3 ऑक्टोबरला अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग व महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. 5 ऑक्टोबरला महिला व आरक्षित प्रभागांच्या सोडतीची तसेच प्रभाग रचनेची अधिसूचना राज्य सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान प्रभाग रचनेबाबत हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. 5 नोव्हेंबरला सुचना व हरकतीवर सुनवाई घेवुन 18 नोव्हेंबरला सुचना व हरकतींवर निर्णय घेतला जाणार आहे. 22 नोव्हेंबरला प्रभाग रचना, अधिसुचना व नकाशामधे योग्य ते बदल करून अंतिम अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रभागरचनेबाबत तपशील
आरक्षण सोडत - 3 ऑक्टोबर 2016
आक्षेपांसाठी कालावधी - 5 ते 20 ऑक्टोबर 2016
सुनावणी - 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत
अंतिम प्रभाग रचना - 22 नोव्हेंबर 2016

No comments:
Post a Comment