जीएसटी लागू केल्यावरही महानगरपालिका स्वायत्त संस्था राहणार - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जीएसटी लागू केल्यावरही महानगरपालिका स्वायत्त संस्था राहणार - मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 4 : वस्तू आणि सेवाकराचा (जीएसटी) कायदा राज्यासाठी करावा लागेल. बृहन्मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्थारहावी आणि महसूल प्राप्त व्हावा यासाठी इन्स्टिट्युशनल मॅकेनिझम करावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
समान कर प्रणाली लागू केल्यानंतर महानगरपालिकेला मिळणाऱ्या महसूलासंदर्भात सदस्य सु‍निल प्रभू यांनी उपस्थित केलेला प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, एक देश एक कर याप्रमाणे कायद्यात नवीन बदल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकराज्यात जीएसटी लागू करणे बंधनकारक राहणार आहे. जकात नाक्याचा वापर पोलीस आऊट पोस्टसाठी करता येईल. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अवैध वाहतूक व व्यापार टाळता येणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages