टीना डाबी यांचा ‘बार्टी’च्या वतीने शुक्रवारी मुंबईत सत्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टीना डाबी यांचा ‘बार्टी’च्या वतीने शुक्रवारी मुंबईत सत्कार

Share This
मुंबईदि. 18 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये देशातून पहिल्या आलेल्या टीना डाबी यांचा ‘बार्टी’च्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) वतीने उद्यादि. 19 ऑगस्ट 2016 रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहेअशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक राजेश ढाबरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी 11.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेविभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार बागडे,समाजकल्याण विभागाचे आयुक्त पीयूष सिंहमुंबई विभागाचे मुख्य आयकर आयुक्त सुबचन रामअन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळेबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडेदिल्लीतील पोलीस अधिकारी संदीप तामगाडगे,सनदी अधिकारी सुनिल वारेसचिन शिंदेमहाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे विजय वाघमारेसीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश ढवळेआयकर विभागाच्या उपायुक्त क्रांती खोब्रागडेविभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोटसुर्वे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

डाबी या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय प्रशासकीय सेवेत देशभरात प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीतील पहिल्या विद्यार्थिनी आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावीयासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात डाबी या मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धा परीक्षार्थींसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार असल्याचेही ढाबरे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages