माझी कन्या भाग्यश्री योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा - पंकजा मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 August 2016

माझी कन्या भाग्यश्री योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा - पंकजा मुंडे

मुंबई, दि.8 ऑग 2016 :  महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढविण्याबरोबरच मुलींचे शिक्षण, आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत असून ही योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचून त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करावे असे निर्देश महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.


मंत्री महोदयांच्या मंत्रालयातील दालनात माझी कन्या भाग्यश्री या योजनेच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.  यावेळी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव, संजयकुमार, एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या आयुक्त, विनिता सिंघल यांच्यासह महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी कन्या भाग्यश्री योजनेत पहिल्या मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी रु.5 हजार व दुसऱ्या मुलीचे स्वागत करण्यासाठी 2 हजार 500 रुपये, वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलीच्या पालनपोषणासाठी दरवर्षी 1 हजार ते 3 हजार रुपये रक्कम देण्यात येईल, मुलीने वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यावर विम्याची रक्कम 1 लाख रुपये बँक खाली जमा होईल, मातेने पहिल्या मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या आजी आजोबांना सोन्याचे नाणे देण्यात येईल, ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर 1 हजारपेक्षा जास्त असेल अशा गावास 5 लाखाचे पारितोषिक दिले जाईल अशी माहिती त्यांनी दिली.

माझी कन्या भाग्यश्री योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हानिहाय नियोजित कार्यक्रम राबविण्यात यावेत. माझा गाव माझा विकास या उपक्रमामध्ये या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी. मुलींच्या जिल्हानिहाय चित्रकला, घोषवाक्ये, निबंध स्पर्धा घेण्यात येऊन जिल्हयात निवड झालेल्या मुलींचे राज्यस्तरीय स्पर्धेंचे आयोजन करुन राज्यस्तरीय मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांना बक्षिस वितरण करण्यात यावे. तसेच या कार्यक्रमांमध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेविषयी सामाजिक संस्था, मंडळे, वैयक्तिक पातळीवर विशेष योगदान देणाऱ्यांना या कार्यक्रमामध्ये सन्मानीत करावे असे मुंडे म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad