महाड अपघात स्थळी आपत्ती निवारण व मदत कक्ष स्थापन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाड अपघात स्थळी आपत्ती निवारण व मदत कक्ष स्थापन

Share This
अलिबाग दि. 4 महाड जवळील सावित्री नदीवर असलेल्या पुलाच्या अपघात स्थळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपत्ती निवारण कक्ष तसेच मदत केंद्राची स्थापना करण्यात आली असून महाड उपविभागीय अधिकारी सुषमा सातपुते तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे या नियंत्रण कक्षात समन्वयक आहेत.


नातेवाईकांना सहकार्य
या कक्षामार्फत शोध कार्यावर नियंत्रण तसेच बेपत्तामृतांच्या नातेवाईकांना माहिती देणे मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था पहाणे या बरोबरच सापडलेल्या मृतदेहाचे शव विच्छेदन व संबंधीतांच्या गावापर्यंत मृतदेह पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येत आहेशोध कार्य व्यवस्थितरित्या सुरू आहे. आजरात्री आठ वाजेपर्यंत 14 मृतदेह सापडले असून त्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेतमुंबई-जयगड या बसचे वाहनचालक श्रीकांत शामराव कांबळे,शेवंती मिरगलसंपदा संतोष वाझेपांडूरंग बाबू घागआवेद अल्प्ताफ चौगुलेप्रशांत माने.
        
शोध कार्यासाठी एनडीआरएफचे पथकनौदलहवाई दलस्थानिक पोलीस यांच्यासह  300 किलो वजनाचे लोहचुंबकबोटराफटींगस्कूबा डायव्हिंगस्थानिक मच्छीमारांची मदत  घेण्यात येत आहेया कामी नियंत्रक म्हणून अप्पर पोलीस अधिक्षक संजय पाटील कार्यरत आहेतशोध पथकातील जवान तसेच बेपत्ता व्यक्तींचे नातेवाईक यांच्या भोजन निवासासाठी महाड मधील विविध सामाजिक व सेवाभावी संस्था मार्फतही मदत होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क कक्ष

या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियंत्रण कक्ष सुरु असून अप्पर जिल्हाधिकारी पी डी मलिकनेर व निवासी उपजिल्हाधिकारी सतिश बागल हे नियंत्रण करीत आहेत. 02141-222118 टोल फ्री नंबर1077 असे नियंत्रण कक्षाचे क्रमांक आहेतजिल्हाधिकारी शीतल तेली उगले तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक मो.सुवेझ हक हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी संपुर्ण मदत व शोध मोहिमेवर नियंत्रण ठेवून आहेतनागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages