राजभवनात ब्रिटीशकालीन बंकर सापडले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राजभवनात ब्रिटीशकालीन बंकर सापडले

Share This
मुंबईदि. १६ : गेली अनेक दशके बंद असलेले १५० मीटर लांबीचे ब्रिटीशकालीन बंकर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी शोधले आहे. मलबार हिल येथील राजभवनात हे भुयार सापडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशीरा या बंकरला भेट देऊन पाहणी केली. या बंकरचा शोध आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.


फडणवीस यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्यासह बंकरची पाहणी केली. हे बंकर जतन करण्याचा मनोदय राज्यपालांनी व्यक्त केला आहे. तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी राहणाऱ्यांनी राज्यपालांना या बंकरविषयी सांगितले तेव्हा त्यांनी हे बंकर उघडण्याचे आदेश दिले. १२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बंकरच्या पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारासमोर बांधलेली भिंत तोडलीतेव्हा  त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या बंकरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या एकूण १३ खोल्या असून त्यासाठी २० फूट उंचीचा दरवाजा आहे. बंकरच्या पश्चिमेला एक दरवाजा आहे. बंकरमध्ये मोठा पॅसेज असून छोट्या खोल्याही आहेत.

हे बंकर सुमारे ५००० चौरस फुटांचे असून त्याचा वापर दारूगोळाकाडतुसेइतर युद्ध साहित्य ठेवण्यासाठी केला जात होता. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीपासून बंद असलेले हे बंकर आश्चर्यकारकरित्या सुस्थितीत आहे. बंकरला ड्रेनेज सिस्टिम असून हवा खेळती राहण्यासाठी व्यवस्था आहे. पूर्वी गव्हर्मेंट हाऊस अशी राजभवनाची ओळख होती. लॉर्ड रे यांनी १८८५ पासून येथे कायमचे निवासस्थान केले. तत्पूर्वी मलबार हिल हे ब्रिटिश गव्हर्नरांचे उन्हाळ्यातील वास्तव्यासाठीचे ठिकाण होते आणि परळ येथील गव्हर्मेंट हाऊस हे गव्हर्नरांचे निवासस्थान होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages