विजयवाडा : गौरक्षकांची दलितांना मारहाण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विजयवाडा : गौरक्षकांची दलितांना मारहाण

Share This

विजयवाडा 10 Aug 2016 : गुजरात येथील उना येथे मृत गाईचे कातडे काढणाऱ्या दलितांना मारहाणीच्या प्रकारानंतर विजयवाडा येथील जानकीपेटा परिसरातही दोघा दलित भावांना झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे. सोमवारी गौरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी या त्यांना झाडाला बांधून नग्न करून मारहाण केली. 

जानकीपेठ येथे एका शेतकऱ्याची गाय विजेचा धक्का लागून मरण पावली होती. या शेतकऱ्याने मोकाती इलिसा आणि मोकाती राजम या दोघा भावांना हे काम दिले होते. पण तेथील गौरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना या भावांनीच गायीची हत्या केली असावी असा संशय आल्याने त्यांनी या भावांना मारहाण केली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

या प्रकरणानंतर अज्ञातांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथील ‘टाऊनहॉल मीटिंग’ आणि त्यानंतर तेलंगाणा येथे कथीत गौरक्षकांडून दलितांवर होत असल्याचा अत्याचारांचा समाचार घेतला होता. त्यानंतर विजयवाडात हा प्रकार उघडकीस आला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages