अवैध मद्य निर्मिती व विक्री निर्मूलनासाठी मोबाईल ॲपचे 2 ऑक्टोबरला उद्घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अवैध मद्य निर्मिती व विक्री निर्मूलनासाठी मोबाईल ॲपचे 2 ऑक्टोबरला उद्घाटन

Share This
मुंबई, दि. 29 : राज्यात अवैध मद्य निर्मिती (प्रामुख्याने हातभट्टी दारु) व विक्रीची माहिती मिळावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 8422001133 या व्हॉट्स ॲप क्रमांकावर राज्यभरातून तक्रारी प्राप्त होत आहेत. 2 ऑक्टोबरपासून तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक व मोबाईल ॲप उपलब्ध होणार आहे. नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई होणार आहे. पोलीस यंत्रणा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार आहे.

राज्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील ज्या सराईत गुन्हेगारांची यादी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित उपविभागीय दंडाधिकारी/सहायक पोलीस आयुक्त यांना सादर केलेली आहे, त्या व्यक्तींकडून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 93 अन्वये बंधपत्र घेण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या बंधपत्राचे उल्लंघन केलेल्या सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए 1981 कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages