बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी 'थेट भेट’ अभियान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी 'थेट भेट’ अभियान

Share This
मुंबई : रिक्षा, टॅक्सी, रेल्वे, मोनो आणि मेट्रो असे अनेक पर्याय मुंबईकरांना वाहतुकीसाठी उपलब्ध असल्याने बेस्टवरील भार हलका होत असतानाच आता बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी प्रशासनाने ‘प्रवाशांशी थेट भेट’ हे अभियान हाती घेतले आहे.

मुंबई शहरासह उपनगरात धावणाऱ्या बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. बसगाड्यांच्या कमी असणाऱ्या फेऱ्या, वेळेत न येणाऱ्या बसगाड्यांसह इतर अनेक कारणांमुळे बेस्टचे प्रवासी अन्य वाहतूक साधनांकडे वळत आहेत. यावर उपाय म्हणून अत्याधुनिक अशा बसगाड्या यापूर्वीच प्रशासनाने आपल्या ताफ्यात दाखल केल्या आहेत. या बसगाड्यांच्या आसन व्यवस्थेत उल्लेखनीय बदल करण्यात आले असून, बेस्टमध्ये मोबाइल चार्जिंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांमध्ये बेस्टबद्दल विश्वास निर्माण करण्यासह उत्पन्न आणि प्रवासी वाढवणे हा अभियानाचा हेतू आहे. या अंतर्गत ११ सप्टेंबर रोजी धारावी, काळा किल्ला, कुर्ला, मरोळ, मजास, दिंडोशी आणि मागाठाणे या आगारांचे व्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी सकाळी ११ वाजता आगारांमध्ये प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि सूचनांची नोंद घेतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages