हिंदुस्तान पेट्रोलियमला १४९५ तर भारत पेट्रोलियमला १४५५ सिलिंडर्स दिले
लवकरच उर्वरित ४३३ सिलिंडर्स देखील हस्तांतरित करणार
मुंबई / प्रतिनिधी - अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर महापालिकेद्वारे करण्यात येणा-या धडक कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले सिलिंडर्स तसेच उपहारगृहांच्या तपासणी दरम्यान आढळून आलेला अनधिकृत सिलिंडर्स साठा महापालिकेद्वारे जप्त करण्यात येतो. यानुसार जप्त करण्यात आलेले सिलिंडर्स भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील संबंधित पेट्रोलियम कंपन्यांना हस्तांतरित करण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार जप्त करण्यात आलेले २९५० गॅस सिलिंडर्स महापालिकेच्या अनुज्ञापन खात्याद्वारे (License Dept.) संबंधित पेट्रोलियम कंपन्यांना हस्तांतरित करण्यात आले आहेत, तर उर्वरित ४३३ गॅस सिलिंडर्स देखील लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलन व फेरीवाल्यांचे नियमन) मिलिन सावंत यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यावर महापालिकेद्वारे नियमितपणे कारवाई करण्यात येत असते. या कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी घरगुती स्वरुपाचे (Domestic) वा व्यवसायिक स्वरुपाचे (Commercial) एल.पी.जी. गॅस सिलिंडर्स आढळून येतात. हे गॅस सिलिंडर्स महापालिकेच्या संबंधित खात्याद्वारे तात्काळ जप्त करण्यात येतात. तसेच महापालिका क्षेत्रातील उपहारगृहांमध्ये मान्यतेपेक्षा अधिक संख्येने गॅस सिलिंडर्स चा साठी आढळून आल्यास सदर साठा देखील जप्त करण्यात येतो. याप्रकारे जप्त करण्यात आलेले घरगुती स्वरुपाचे (Domestic) वा व्यवसायिक स्वरुपाचे (Commercial) एल.पी.जी. गॅस सिलिंडर्स भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील संबंधित पेट्रोलियम कंपन्यांपैकी ज्या कंपनीचे असतील त्यांना हस्तांतरित करण्यात यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी १९ डिसेंबर २०१५ रोजीच्या परिपत्रकानुसार दिले होते.
सदर आदेशांनुसार महापालिकेद्वारे आतापर्यंत १ हजार ४९५ गॅस सिलिंडर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला देण्यात आले आहेत. तर या याव्यतिरिक्त १४१ सिलिंडर्स लवकरच हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला सुपूर्द करण्यात येणार आहेत. तर भारत पेट्रोलियम या कंपनीला १ हजार ४५५ गॅस सिलिंडर्स हस्तांतरित करण्यात आले असून उर्वरित २९२ सिलिंडर्स देखील लवकरच हस्तांतरित करण्यात येणार आहेत. यानुसार महापालिकेद्वारे जप्त करण्यात आलेले साधारणपणे २ हजार ९५० सिलिंडर्स संबंधित पेट्रोलियम कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले असून उर्वरित ४३३ सिलिंडर्स (एकूण ३,३८३ सिलेंडर्स) देखील लवकरच हस्तांतरित करण्यात येणारे आहेत, अशीही माहिती उपायुक्त मिलीन सावंत यांनी दिली आहे.