17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन
मुंबई, दि. 16 : राज्यातील किनारपट्टी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या वतीने आंतरराष्ट्रीय सागरी स्वच्छता दिनाचेऔचित्यसाधून उद्या, शनिवार दि. 17 सप्टेंबर 2016 पासून सागर स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यानिमित्त सागरी स्वच्छताअभियानाच्या जनजागृतीसाठी मुंबईतील जुहू बीच येथे प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी उभारलेल्या वाळू शिल्पाचे उद्घाटन उद्या सकाळी साडेदहावाजता बंदर विभागाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.महाराष्ट्राला लाभलेल्या सागरी किनारे स्वच्छ व सुंदर रहावेत, पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांची जपणूक व्हावी, यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सागरकिनारा स्वच्छता मोहिम आखली असून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2016 या पंधरवड्यात राज्यातील सर्व किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. पंधरवड्या निमित्त बोर्डाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर 2016 रोजी ‘निर्मल सागर तट अभियाना’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात होणार आहे, अशी माहितीमेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी दिली आहे.
जगप्रसिद्ध वाळूशिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनाईक हेही या निर्मल सागर अभियानात सक्रिय सहभागी होणार आहेत. जुहू बीच येथे ते अभियानाचीमाहिती सांगणारे वाळूशिल्प उभारणार आहेत. या शिल्पाचे उद्गाटन राज्याचे बंदर विभागाचे राज्यमंत्री तथा महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे उपाध्यक्ष रवींद्र चव्हाणयांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे.
तत्पूर्वी सागर स्वच्छता अभियानाअंतर्गत उद्या (दि. 17 सप्टेंबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत वर्सोवा सागर किनाऱ्यावर स्वच्छता अभियानराबविण्यात येणार आहे. यामध्ये वर्सोवा परिसरातील शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी, परिसरात राहणारे नामवंत व्यक्ती व नागरिक, राष्ट्रीय छात्रसेनेचेविद्यार्थी, मेरिटाईम बोर्डाचे कर्मचारी हे सहभागी होऊन सागरी किनारा स्वच्छता करणार आहेत.
