मुंबई : विनापरवाना वाहन चालकांना आळा बसविण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. सन २०१२ ते २०१६ या साढे चार वर्षात ३२ हजार ६८४ केसेस दाखल झाल्या आहेत.
विनापरवाना वाहन चालकां विरोधात वाहतूक पोलिसांनी कंबरही कसली असली तरीही त्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. २0१२ मध्ये ५,३२१ केसेसची नोंद वाहतूक पोलिसांकडे झाली होती. २०१३ मध्ये हा आकडा ६ हजार ३0१ एवढा झाला. २0१६ च्या जुलै महिन्यापर्यंत तर ५ हजार ४८२ विनापरवाना चालकांची नोंद झाली आहे. यात अल्पवयीन चालकांचेही प्रमाण मोठे आहे. खार येथील पेट्रोल पंपावर विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची नोंद करताना एका अल्पवयीन दुचाकीस्वाराला विलास शिंदे यांनी हटकले. त्यानंतर झालेल्या वादात शिंदे यांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना घडली. यानंतर पोलिसांनी हि मोहीम अधिक तीव्र केली आहे.
