बेस्ट प्रवाश्यांना बसची अचूक वेळ आधीच मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट प्रवाश्यांना बसची अचूक वेळ आधीच मिळणार

Share This
बेस्ट लवकरच एप्स सुरु करणार
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईची लाइफ़लाइन असलेली बेस्ट प्रवाशांच्या सोयी साठी बस किती वेळात स्टॉपवर येईल याची अचूक माहिती देणारे एप्स लवकरच आणणार आहे. या एप्सचे सादरीकरण गुरुवारी बेस्ट समितीमधे करण्यात आले आहे.

झोपाप कंपनीकडून हे एप्स बनवण्यात आले आहे. सध्या ही सिस्टिम बेस्टच्या 15 बसमधे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली आहे. जीपीएस तंत्रावर हे एप्स काम करणार असल्याने प्रवाश्यांना बसची वेळ अचूक मिळणार आहे. प्रवाश्यांना एखाद्या रुटवर प्रवास करावयाचा असल्यास किंवा एखाद्या स्टॉपपर्यंत प्रवास करावयाचा असल्यास त्यामार्गावरील रुट, बस स्टॉप, भाड़े याची तसेच एखादी बस निघून गेल्यास त्याच्या नंतरची बस किती वेळात स्टॉपवर येईल याची माहिती मिळणार आहे. एप्समधे प्रवाश्यांना फीडब्याक व तक्रारिची तसेच लहान मुले प्रवास करत असल्यास त्यांच्या पालकांना त्यांची माहिती शेअर करण्याची सुविधा आहे. या एप्स द्वारे कोणती बस किती चालली, बस कुठे आहे, इत्यादी बसची संपूर्ण माहिती बेस्ट उपक्रमाला वेबबेस ड्याशबोर्ड द्वारे मिळणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages