राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक मराठीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक मराठीत

Share This
मुंबई, दि. २१ : राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक हे देवनागरी लिपीत असावेत, यासाठी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. मंत्री गडकरी यांनी या प्रस्तावास तत्वत: मान्यता देऊन तसे आदेश काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती मंत्री रावते यांनी दिली.
रावते म्हणाले की, राज्यात मागच्या वेळी परिवहन मंत्री असताना वाहनांवरील क्रमांक हे मराठी भाषेत असावेत यासाठी आपण आग्रह धरला होता. पण त्यावेळी केंद्र सरकारने इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत क्रमांक असावेत असे आदेश दिले. त्यामुळे त्यावेळी वाहनांवर दोन्ही भाषेतील क्रमांक लावण्यासंदर्भातील आदेश राज्य शासनामार्फत निर्गमित करण्यात आले. आता राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांवरील क्रमांक मराठी भाषेत असावेत, अशी मागणी केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन देऊन केली आहे. या निवेदनाची दखल घेत त्यांनी या प्रस्तावास तत्वत: मान्यता दिली आहे. शिवाय तसे आदेश निर्गमित करण्यासंदर्भातही विभागास सूचना दिल्या आहेत. केंद्र शासनाकडून या संदर्भातील आदेश प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रातील राज्याबाहेर न जाणाऱ्या वाहनांचे क्रमांक मराठी भाषेत असावेत, असे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages