घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - राजकुमार बडोले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - राजकुमार बडोले

Share This
मुंबई, दि. 22 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वास्तव्य केलेले घाटकोपरच्या चिरागनगर येथील घर राज्य शासन ताब्यात घेऊन तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वास्तव्य केलेल्या चिरागनगर येथील घराला बुधवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाचे माजी अध्यक्ष मधुकरराव कांबळे यांनी भेट दिली. घराची पाहणी केल्यानंतर श्री. बडोले बोलत होते. स्मारकाच्या जागेसंदर्भात तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यात येईल. पुढील 15 दिवसांत मंत्रालयात बैठक आयोजित करुन स्मारकाचा आराखडा निश्चित करण्यात येईल, असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages