मुंबई - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या विधामाने समाजातील विविध क्षेत्रातील समाजकार्य, कला, मनोरंजन, क्रीडा, साहित्य, पत्रकारिता, राजकारण, चळवळ, इत्यादी क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या २५ जणांना समाजरत्न भुषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यामध्ये पॅथर चळवळीचे कार्यकर्तें रतन अस्वारे, पत्रकार राजा आदाटे, प्रभाकर कांबळे आदीसह इतर मान्यवरांना "समाजरत्न" हा मानाचा आणि प्रतिष्ठतेचा समजाला जाणारा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी दिली. सदर कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा देखील नवीमुंबईच्या वतीने नागरी सत्कार होणार असुन सदर कार्यक्रमास समाजातील अनेक प्रतिष्ठित नेते व सनदी अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहे. सदर पुरस्कार सोहळा कार्यक्रम १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:०० वा.विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाला मोट्यासंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद इंगळे यांनी केले आहे.
