गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची आरे वसाहतीतील व्यायामशाळा अनधिकृतच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची आरे वसाहतीतील व्यायामशाळा अनधिकृतच

Share This
लोकायुक्तांनी पुढील चौकशीचे दिले आदेश
मुंबई - आरे वसाहतीच्या जमिनीवर गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अनधिकृतपणे उभारलेल्या अत्याधुनिक व्यायामशाळेच्या विरोधात संजय निरुपम यांनी लोकायुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, माननीय लोकायुक्त या निष्कर्षापर्यंत पोचल्याचे दिसून येते की, रवींद्र वायकर यांनी सदरची व्यायामशाळा बांधताना महानगरपालिकेच्या प्रचलित नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी आढळून येते.

यापुढेही सदर चौकशी सुरूच राहील व त्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र वायकर यांनी गृहराज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर सदर व्यायामशाळेचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचे माहीत असूनही सदर व्यायामशाळा निष्कासित करण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही अथवा ठोस पाऊलेसुद्धा उचलली नाहीत. आरे वसाहतीकडून वसाहतीकडून वेळोवेळा सदर व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासंदर्भात आरेच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आलेल्या पत्रांकडे हेतुतः डोळेझाक करण्यात आली आहे का, याबाबत पुढील तपास सुरूच राहील. तसेच आदिवासी पाडे नागरी सोयीसुविधा या अंतर्गत उभारण्यात आलेल्या या व्यायामशाळेची उपयोगीता ही स्थानिक अधिकृत झोपडीधारक आदिवासी यांच्याकरिता होते का नाही, हे सुद्धा यापुढे पाहणे संयुक्तिक ठरेल. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादाकरिता पुढील सुनावणी दिनांक १८ व १९ ऑक्टोबर रोजी मुक्रर करण्यात आलेली आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली. सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत त्यांचे वकील प्रद्युमन वाघमारे, सरचिटणीस भूषण पाटील, उपाध्यक्ष इंदुप्रकाश तिवारी, सचिव डॉ. किशोर सिंह, असलम फारुकी आणि फिरोज शाह उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages