मुंबई - लालबागमधील प्रसिध्द 'लालाबागचा राजा' गणेशोत्सव मंडळ पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहे. लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यावर ऑनडयुटी पोलिस अधिका-याबरोबर गैरवतर्णूक केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोसायटी गेटमधून आत जाण्यापासून पोलिस अधिका-याला रोखण्यात आले. त्यावरुन वादाची ठिणगी पडली. एपीआय दर्जाच्या या अधिका-याला धक्काबुक्की करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. कलम ३५३ आणि ३३२ अंतर्गत या कार्यकर्त्याविरोधात काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागच्या काही वर्षांमध्ये लालबाग राजा मंडळाच्या कार्यकर्त्यां विरोधात अनेक तक्रारी झाल्या आहेत. मागच्या वर्षी महिला पोलिसाला झालेली मारहाण, महिला भाविकाशी असभ्य वर्तन असे अनेक आरोप या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर झाले आहेत.