पालकमंत्री विष्णू सवरा यांना मयत बालकाच्या आईने हाकलून दिले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2016

पालकमंत्री विष्णू सवरा यांना मयत बालकाच्या आईने हाकलून दिले

६०० बालकं मेली तर असुदेत ना, त्यात काय झाले : मंत्री सवरा यांचे वक्तव्यमोखाडा दि.१५ सप्टेंबर - आज तालुक्यातील खोच ग्रामपंचायत हद्दीतील कलमवाडी येथे आदिवासींचा सरकारविरोधातला संताप पाहायला मिळाला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा हे आज कुपोषणाने मृत्युमुखी पडलेला बालक सागर वाघ यांच्यात कुटुंबियांना भेटायला आले होते. मात्र सागरच्या आईने आणि आजीने चक्क सवरा यांना दारातूनच हाकलून दिले. आज पंधरा दिवसानंतर फक्त फोटू काढून घ्यायला आले आहेत का? असा संतप्त सवाल सागरची आई सीता हिने मंत्री महोदयाना विचारून अगदी दारातच त्यांचा पाणउतारा केला. अखेर मंत्री माहोदयाना ताफ्यासह काढता पाय घ्यावा लागला.
30 ऑगस्ट रोजी सागर वाघ याचा कुपोषणाने मृत्यू झाला होता. सागर वाघ हा श्रमजीवी संघटना आणि श्री विठू माऊली ट्रस्ट च्या माध्यमातून सुरु असलेल्या बाल संजीवन छावणी मध्ये उपचार घेत होता. सरकारने VCDC योजना सुरु केल्याची घोषणा केली आणि सागर चे पालक त्याला घरी घेऊन आले. सरकारच्या सगळ्या योजना कागदावरच राहिल्या आणि त्यानंतर उपचाराभावी त्याचा मृत्यू झाला. सागर हा आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या विधानसभा मतदारसंघातला होता, आज तब्बल पंधरा दिवसानंतर आदिवासी विकास मंत्री सागरच्या घरी आले होते. यावेळी श्रामजीवी संघतेचे विजय जाधव, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, पांडू मालक, संतोष धिंडा,गणेश माली यांनी सवरा यांना जाब विचारला, तेव्हा सवरा म्हणाले तुम्ही नका बोलू, तर मयत सागरची आई मंत्री सवरा यांना परखड पणे म्हणाली "त्या श्रमजीवी संघटने वाल्या कार्यकर्त्यांना काय गप्प करता, त्यांनी माझ्या मुलाचा उपचार केला, पूर्ण उन्हाळा त्यांनी आम्हाला छावणी ठेवले,पोसले आम्हाला आणि तुम्ही आता आलेत फोटो काढायला, निघा इथून परत इथे यायचे नाही" असे उत्तर देऊन मंत्री सवरा यांना अक्षरश हाकलून काढले. 

श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा सांगितले की गेल्या वर्षभरात 600 बालकं कुपोषणाने मरण पावली आहेत तेव्हा मंत्री सवरा यांनी थक्क करणारे उत्तर दिले. सवरा म्हणाले *" मेली मग काय झाले, असुदेत ना, बघू आम्ही करू काय ते"* अत्यंत बेजबाबदार वक्तव्य यावेळी मंत्री महोदयांनी केले.
आता या गावाने निर्धार केला आहे की आता आदिवासींची थट्टा पुरे, नुसते दौरे आणि भेटी नको, जो पर्यंत पालघर जिल्यातील बाल विकास अधिकारी,आरोग्य अधिकारी आणि इतर सर्व रिक्त पदे भरत नाही, 0 ते 6 वयोगटातील प्रत्येक बालकाला पोषक आहार मिळत नाही, प्रत्येक गरोदर मातेला ती गरोदर असल्याचे काळाल्यापासून पोषक आणि चौरस आहार मिळत नाही तो पर्यंत गावात एकही मंत्र्याला पाय ठेऊ देणार नाही असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिल्याचे खोच गावचे सरपंच पांडू मालक यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS