फिरोजशाह मेहता उद्यान व कमला नेहरु उद्यान यांना पुलाने जोडणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फिरोजशाह मेहता उद्यान व कमला नेहरु उद्यान यांना पुलाने जोडणार

Share This
विस्तारित व्ह्युइंग गॅलरीसह दोन्ही उद्यानांचे सुशोभिकरण प्रस्तावित 
विहंगावलोकनासाठी अभिनव 'तरुशिखर पायवाट' प्रस्तावित !
मुंबई / प्रतिनिधी
मलबार हिलच्या कमला नेहरु पार्क मधील म्हातारीचा बूट, फिरोजशाह मेहता उद्यानात झाडातून साकारलेले प्राणी हे मुंबईकर नागरिक आणि लहानग्यांसाठीच नव्हे तर मुंबईत येणा-या सर्व पर्यटकांसाठी आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. कमला नेहरु पार्क आणि फिरोजशाह मेहता उद्यान (हँगींग गार्डन) या बृहन्मुंबई महापालिकेच्या दोन्ही उद्यानांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. ही दोन्ही उद्याने अधिक आकर्षक, अधिक मनोरंजनात्मक व अधिक माहितीपूर्ण व्हावीत यादृष्टीने या उद्यानांचा कायापालट करण्याचे महापालिकेद्वारे प्रशासकीय स्तरावर प्रस्तावित करण्यात आले असून याबाबत प्रस्ताव मा. स्थायी समिती कडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.


दोन्ही उद्यानांच्या प्रस्तावित सुशोभिकरणांतर्गत जोडणारा पादचारी पूल, उद्यानाचे विहंगावलोकन करता येईल अशी तरुशिखर पायवाट (कॅनोपी वॉक), म्हातारीच्या बुटाचे नूतनीकरण, मराठी - हिंदी - इंग्रजी भाषेतील लोकप्रिय बालगीतांवर आधारित रंगरंगोटी, नवीन देशी झाडांची लागवड, कमला नेहरु पार्कमधील सध्या अस्तित्वात असलेल्या व्ह्युइंग गॅलरीचा विस्तार यासारख्या अनेक बाबी प्रस्तावित करण्यात आल्या असल्याची माहितीही अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.

फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरु पार्क या दोन्ही उद्यांनांचे सुशोभिकरण अधिक आकर्षक, अधिक मनोरंजनात्मक व अधिक माहितीपूर्ण व्हावे यासाठी महापालिकेद्वारे नेमण्यात आलेल्या `एन्व्हीरो डिझायनर्स लि.' या संस्थेने याबाबत उद्यानांना भेट देणा-या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या होत्या. त्या अनुरुप सदर संस्थेने दोन्ही उद्यांनाच्या प्रस्तावित सुशोभिकरणाचे आरेखन तयार केले आहे. त्यानुसार आता या दोन्ही उद्यानांची जबाबदारी असणा-या महापालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे या दोन्ही उद्यानांचे सुशोभिकरण प्रस्तावित करण्यात आले आहे. मलबार हिल परिसरातील फिरोजशाह मेहता उद्यान व कमलानेहरु पार्क ही महापालिकेचे दोन्ही उद्याने समोरासमोर आहेत. फिरोजशाह मेहता उद्यानाचे क्षेत्रफळ हे सुमारे ४६ हजार चौ.मी. असून कमला नेहरु उद्यानाचे क्षेत्रफळ ६६ हजार ४१५ चौ.मी. एवढे आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages