मंत्रालयात सोमवारी ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मंत्रालयात सोमवारी ऑनलाईन लोकशाही दिनाचे आयोजन

Share This
मुंबई, दि. 1 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दिनांक ,3 ऑक्टोबर, 2016 रोजी सकाळी 11 वाजता, मंत्रालयातील मा. मुख्यमंत्री महोदय यांचे समिती कक्ष, सहावा मजला येथे ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. 
मंत्रालय लोकशाही दिनी ज्या अर्जदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत त्यांना सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील अर्जदारांना लोकशाही दिनी मुख्यमंत्री यांच्यासमक्ष निवेदन मांडण्याकरिता मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील संबंधीत अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात दिनांक 3 ऑक्टोबर,2016 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशा अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages