मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य खात्यातर्फे ‘एफ/दक्षिण’ विभागातील भोईवाडा विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यास्तव भोईवाडा विद्युतदाहिनी शुक्रवार, दिनांक २८ ऑक्टोबर, २०१६ ते शुक्रवार, दिनांक २७ जानेवारी, २०१७ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या स्मशानभूमीत लाकडावरील अंत्यसंस्काराचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच विद्युतदाहिनी अंत्यसंस्काराकरीता पर्याय म्हणून शिवाजी पार्क, दादर विद्युतदाहिनी, वरळी विद्युतदाहिनी, शीव विद्युतदाहिनी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासन दिलगीर आहे.