महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा द्याव्यात - प्रभाकर देशमुख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2016

महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांना उत्तम सुविधा द्याव्यात - प्रभाकर देशमुख

मुंबई, दि. 19 Nov 2016 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने तयारी करावी, असे निर्देश कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी आज येथे दिले. 
महापरिनिर्वाण दिनाच्या तयारी संबंधीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कोकण यांच्या दालनात (जुने सचिवालय) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी डॉ.अश्विनी जोशी, बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

महापालिकेने केलेल्या तयारीचा आढावा घेऊन देशमुख म्हणाले की, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या सख्येंने अनुयायी चैत्यभूमी येथे येत असतात. या अनुयायांना योग्य त्या सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व पोलीस खाते तयारी करत आहे. अनुयायांना चांगल्या सोयीसुविधा मिळण्याबरोबरच त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. यावर्षी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करुन या दिवसाचे पावित्र्य राखण्यात यावे. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.

दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी चैत्यभूमी व परिसरात मंडप,पिण्याच्या पाण्याचे नळ तसेच टँकर, बंदीस्त व फिरते शौचालये, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आदी व्यवस्था महापालिकेने चांगल्या प्रकारे उपलब्ध्‍ा कराव्यात, असे निर्देशही देशमुख यांनी दिले. महापरिनिर्वाण दिन शांततेत पार पाडण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती नेहमीच सहकार्य करीत असते. ही समिती शासन व अनुयायी यांच्यात दुवा म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad