नांदेड येथे चर्मकार समाजाचा शनिवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नांदेड येथे चर्मकार समाजाचा शनिवारी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा

Share This
नांदेड (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद अाणि अखिल भारतीय रविदासियां समाज महासंघ"तर्फे राज्यस्तरीय वधु - वर परिचय व समाज प्रबोधन मेळावा, नांदेड येथे दिनांक 24 डिसेंबर 2016 शनिवार रोजी सकाळी 11.00 ते सायं. 04.00 वाजेपर्यंत अायोजित करण्यात अाला अाहे.
सर विश्वेश्वरय्या सभागृह, भगिरथनगर, जंगमवाडी रोड, नांदेड येथे अायोजित मेळाव्याचे उदघाटन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष अशोक लहाने यांचे हस्तू होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष नामदेव फुलपगार, रविदासियां समाज महासंघाचे संस्थापक व्यंकटराव दुधंबे यांची उपस्थिती राहणार अाहे. या मेळाव्यास येतांना पोस्ट कार्ड साईज फोटो सोबत आणावा, आपल्या विवाह ईच्छुक मुला/मुलीला सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे, नाव नोंदणी व कार्यक्रम संयोजन शुल्क फक्त 100/- ठेवण्यात अाले अाहे. सकाळी दहापासून कार्यक्रमस्थळी नाव नोंदणी सुरु करण्यात येईल. परिचय मेळावा हा एक सामाजिक उपक्रम आहे, पैसा कमवणे हा उद्देश नाही तर सामाजिक भावनेतून अावर्जून उपस्थित राहून या संधीचा अवश्य लाभ घ्यावा. समाजातील आपले ईतर बांधव यांना "वधु - वर परिचय मेळावा" बाबत माहिती कळवावी असे अावाहन परिषदेचे राज्य संघटक गजानन जमदाडे, राज्य उपाध्यक्ष देविदास टोम्पे, जिल्हाध्यक्ष प्रकाश कामळजकर, अॅड. सिद्धेश्वर खरात, युवा जिल्हाध्यक्ष शिवराज कांबळे, धनराज कांबळे, शहराध्यक्ष संजय वाघमारे अादिंनी केले अाहे. अधिक माहितीसाठी चंद्रसेन गंगासागरे, संयोजक, समता परिषद वधू - वर केंद्र, नांदेड किंवा 9561718130/ 8554995320/ 9822619463 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे अावाहन संयोजकांच्या वतीने करण्यात अाले अाहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages