ख्रिसमस सुट्टीवरुन पालिकेचा गोंधळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ख्रिसमस सुट्टीवरुन पालिकेचा गोंधळ

Share This
मुंबई - ख्रिसमस सुट्टीस घेऊन पालिकेचा गोंधळ सुरु असून सोमवारी पालिकेची उर्दू शाळा सुरु ठेवण्यात आली तर मराठी आणि हिंदी शाळेस सुट्टी देण्यात आली. या गोंधळाची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांस देत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिकेतंर्गत सर्व शाळात एकच नियम आणि निकष जारी करण्याची मागणी केली आहे.

काल सोमवारी मराठी आणि हिंदी शाळेस सुट्टी जाहीर करण्यात आली तर उर्दू शाळा सुरु होती. यामुळे गोंधळ निर्माण झाला . कित्येक मुले शाळा आहे म्हणून सकाळी शाळेत आली होती पण शाळेचे दार बंद होते. महानगरपालिकेत शिक्षण खात्यानी एकच निर्णय घेणे आवश्यक आहे. सरसकट सुट्टी जाहीर करा किंवा शाळा सुरु ठेवावी. याबाबतीत भविष्यात सुधार करत योग्य तो निर्णय घेत मुंबई महानगरपालिकेतंर्गत सर्व शाळात एकच नियम आणि निकष जारी करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages