मुंबई महापालिकेने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या उपस्थितीत मुंबई हागणदारीमुक्त केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे आठ दहा दिवसापूर्वी सलमान खानला स्वच्छतादूत बनवून जनजागृती मोहिमेत उतरवण्यात आले. ही मोहीम शहरात गल्लो गल्ली पोहोचण्याआधीच महापालिकेने मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर करून टाकले आहे. तसे महापौर स्नेहल आंबेकर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी राज्याचे नगरविकास खाते व शहरी भागासाठीच्या 'स्वच्छ भारत' अभियानाचे राज्याचे संचालक यांना पत्र लिहून कळविले आहे.
२ ऑक्टोबर २०१४ रोजी केंद्र शासनाने 'स्वच्छ भारत' अभियान सुरु केलेले आहे. ऑक्टोबर २०१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार महापालिकेच्या २४ विभागांमध्ये ११८ ठिकाणी हागणदारी होत असल्याचे निदर्शनास आले होते. स्वच्छ भारत अभियानातील निकषांनुसार हागणदारी होणा-या भागात ५०० मीटरच्या परिघात सर्वत्र शौचालये उपलब्ध करुन देणे बंधनकारक होते. तशी ती आता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. आता हे सर्व विभाग 'हागणदारी मुक्त' झालेले असून जेथे शौचालयांचे बांधकाम सुरु आहे तेथे फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
पश्चिम व मध्य रेल्वेच्या रुळालगत होणारी हागणदारी थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दोन्ही विभागांच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून या भागात आवश्यक असणारी शौचालये उभारण्यासाठी सहकार्य करण्याचीही विनंती केलेली आहे. मुंबईत आतापर्यंत १ हजार ६४१ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आली असून ३ हजार ८७७ आसनांच्या शौचालयांचे बांधकाम सुरु आहे. यापूर्वी महापालिका क्षेत्रात ८ हजार ४१५ शौचालयांमध्ये सुमारे ८० हजार आसने आहेतजेथे शौचालयांचे बांधकाम सुरु आहे किंवा काही अडचणींमुळे शौचालयाचे बांधकाम करता आलेले नाही, अशा ठिकाणी सुमारे ८०० आसनांची फिरती शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. संबंधितांनी या शौचालयांचा वापर करावा, यासाठी पालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष हागणदारीच्या ठिकाणी संबंधितांना शौचालयांचा वापर करण्याबाबत विनंती करण्यासोबतच या भागात होर्डिंग्स, पोस्टर, बॅनर्सही उभे करण्यात आलेले आहेत. याशिवाय या भागात प्रबोधनासाठी पथनाट्यांचे प्रयोगही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत.
हागणदारी जेथे होत होती त्या भागात 'क्लीनअप मार्शल' ची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते संबंधितांना त्या भागात असलेल्या शौचलायाचा वापर करावा, अशी विनंती करीत आहेत. असे हि पालिकेने कळविले आहे .