घाटकोपरमध्ये सेल्फी पॉईंटचे विद्या बालनच्या हस्ते उदघाटन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 December 2016

घाटकोपरमध्ये सेल्फी पॉईंटचे विद्या बालनच्या हस्ते उदघाटन

मुंबई : घाटकोपरमध्ये सेल्फी पॉईंट बनवण्यात आला आहे. काँग्रेसचे नगरसेवक व मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी घाटकोपर पूर्वेला असलेल्या जसवंतराय मेहता उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ 'लव्ह घाटकोपर' या नावाचा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्याने बालनने तिच्या आगामी 'कहानी-२' या सिनेमाचे प्रमोशनही केले. 

'लव्ह घाटकोपर' या ठिकाणी येऊन विद्याने सेल्फी काढून या सेल्फी पॉईंटचे उदघाटन केले. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. या कार्यक्रमाला प्रभाग समितीचे अध्यक्ष हारुन खानदेखील उपस्थित होते. विद्या बालनला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. अनेकांनी लांबूनच स्टेजवर दिसणार्‍या विद्या बालनसोबत सेल्फी काढले. यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. प्रवीण छेडा यांच्या नगरसेवक निधीतून महापालिकेने या उद्यानाचे नूतनीकरण करून सेल्फी पॉईंट तयार केला आहे.

Post Bottom Ad