
बीएमडब्लू ग्रुप इंडियाचे प्रेसिडंट फ्रॅंक श्लोडर यांनी मिनी ब्रँडची मिनी क्लबमॅन कार गुरुवारी (१५ डिसेंबर) सादर केली. रवि बजाज जन्टलमेन लेबलच्या फैशन शोच्या माध्यमातून मिनी क्लबमॅन सादर करण्यात आली. ब्रिटिश क्राफ्टसमनशिप व उत्तम जर्मन इंजिनीयरींग यांचा उत्तम मेळ या कार मध्ये आहे. या कारची एक्स शोरूम किम्मत 37 लाख 90 हजार इतकी आहे.