अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते जी उत्तर विभागातील कार्यतत्पर अधिकाऱ्यांचा गौरव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते जी उत्तर विभागातील कार्यतत्पर अधिकाऱ्यांचा गौरव

Share This
मुंबई / २३ डिसेम्बर २०१६ - 
मुंबई महानगरपालिकेत काम करताना सर्वानी जे काम आपल्याकडे आले आहे ते स्वतःचे कार्य समजून करावे आयुष्यात शेवटी आपले कार्यच लक्षात राहते असे सांगत अतिरिक्त आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी जी उत्तर विभागातील पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांना स्फूर्ती देण्याचे काम केले. प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव यांच्या संकल्पनेतील व त्यांच्या विभागातील कार्यक्षम कर्मचारी गौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या .
मुंबई महानगपालिकेतील ज्यांचे नाव सर्वात कार्यतत्पर प्रामाणिक अधिकारी म्हणून आजही चर्चिले जाते त्या गो. रा खैरनार यांच्या नावाने जी उत्तर विभागातील कार्यक्षम कर्मचाऱ्यांचा विशेष पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी राजेश राठोड , दुय्य्म अभियंता सुप्रिया मिराशी , भाडेसंकलक आणि सूर्यकांत गुरव कामगार याना ऑकटोबर मधील कार्यक्षम अधिकारी म्हणून गौरविण्यात आले . तर संदीप कदम , दुय्यम अभियंता , संगीत कांदळगावकर वरिष्ठ लघुलेखक आणि विजय खांडवे कामगार यांना नोव्हेंबर डीसेम्बर महिन्यातील उत्कृष्ठ कामाबद्दल गौरविण्यात आले . या सर्व कार्यक्षम कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .

यावेळी पल्लवी दराडे यांनी सदर कार्यक्रमाचे कौतुक करून अशाप्रकारे कर्मचाऱ्यांचे कौतुक मोठ्या मनाचे गमक असल्याचे सांगत प्रभाग समिती अध्यक्ष सुधीर जाधव यांच्या कार्याची स्तुती केली . प्रत्येकाने स्वतः च्या कार्याची समीक्षा करणे आवश्यक असून जे जे काम समोर आले आहे ते करणे आपले कर्त्यव्य असल्याचे सांगितले .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages