गोरेगाव येथे प्रभाकर पणशीकर नाट्यगृह उभे राहणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोरेगाव येथे प्रभाकर पणशीकर नाट्यगृह उभे राहणार

Share This
गटनेत्यांच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी
मुंबई ( प्रतिनिधी ) –  गोरेगाव येथील पालिकेच्या टोपीवाला मंडईच्या ठिकाणी उभ्या राहणा-या नवीन नाट्यगृहास जेष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर असे नाव देण्य़ाचा प्रस्ताव गुरुवारी गटनेत्यांच्य़ा बैठकीत मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव आता पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठवण्यात आला आहे.


गोरेगाव पश्चिम येथे महापालिकेची टोपीवाला मंडई आहे. या जागेवर 16 मजली इमारत बांधून तेथे मंडई व नाट्यगृह बांधण्याचा संयुक्त प्रस्ताव होता. 16 मजली इमारत बांधून त्यात तळमजल्यावर मंडई व चौथ्या मजल्यावर नवीन नाट्यगृह जेष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर यांच्या नावाने सुरू करण्याचा प्रस्ताव स्थानिक नगरसेवक राजू पाध्ये यांनी मांडला होता. या प्रस्तावावर गुरुवारी गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रस्तावावर आयुक्तांनी अभिप्राय दिल्यानंतर अमलबजावणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages