बेस्टचे डिजिटलच्या दिशेने पाउल - क्याशलेस सेवेसाठी दोन नवे एप्स - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टचे डिजिटलच्या दिशेने पाउल - क्याशलेस सेवेसाठी दोन नवे एप्स

Share This
मुंबई / प्रतिनिधी 1 Dec 2016
बेस्ट उपक्रम क्याशलेस सेवेसाठी परिवहन आणि विज ग्राहकांसाठी दोन नवे एप्स सुरु करणार आहे. या दोन एप्स पैकी परिवहन उपक्रमाचे एप 10 डिसेंबर पासून तर विज ग्राहकांसाठीचे एप लवकरच सेवेत दाखल केले जाणार आहे. या एप्सच्या माध्यमातून बेस्टने डिजिटलच्या दिशेने पाउल टाकल्याचे बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मीठबावकर यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रम आपल्या ग्रहकाना मोबाईलद्वारे तिकिट घेण्यासाठी आणि पास नुतनीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल एप्स मधून बस नंबर व प्रवास करावयाचे ठिकाण नोंद केल्यावर प्रवाश्याला एक कोड देण्यात येईल. ग्राहक बस मधील कंडक्टरच्या जवळील टिकिट मशीनच्या संपर्कात येताच या कोडच्या माध्यमातून प्रवाश्याला तिकीट दिले जाणार आहे. याच प्रमाणे बस पासही नुतनिकरण केला जाणार आहे.

याच प्रमाणे बेस्टने सध्या एम- पैसा वॉलेट द्वारे विज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. ई वॉलेट प्रणालीचा वापर करता यावा म्हणून एसबीआय बड़ी, पेटीएम, फ्री चार्ज वॉलेटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. विज बिलासंबंधीची सर्व माहिती व विज देयक भरण्याची सुविधा यात देण्यात आली आहे. लवकरच डेबिट व क्रेडिट कार्ड्चा वापर करून नविन बस पास बणवने व नुतणीकरण करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages