कबड्डी स्पर्धेत मुंबई मनपा उपांत्यपूर्व फेरीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कबड्डी स्पर्धेत मुंबई मनपा उपांत्यपूर्व फेरीत

Share This
मुंबई : चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत सागर सावंतच्या चौफेर चढाया व प्रीतम लाडच्या सुंदर पकडीमुळे मुंबई महानगरपालिका कबड्डी संघाने बलाढय़ मुंबई कस्टमचा ४३-२८ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मुंबई कस्टमचा राहुल चव्हाण मात्र चढाईत चमकला. अन्य सामन्यात सेंट्रल बँक, जानकी रामचंद्र पतसंस्था, भारत पेट्रोलियम आदी संघांनी विजयीदौड केली.

लालबाग येथील सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणात स्पर्धेमधील मुंबई महानगरपालिका विरुद्ध मुंबई कस्टम यामधील लढत सागर सावंत, प्रीतम लाड, राहुल चव्हाण यांच्या खेळामुळे चुरशीची झाली. शेवटच्या १0 मिनिटांत मुंबई कस्टम संघावर दोन लोण चढल्यामुळे मुंबई महानगरपालिका संघाच्या बाजूने विजयाचे पारडे झुकले. सेंट्रल बँकेने नेव्हल डॉकयार्डचे आव्हान ४३-१९ असे संपुष्टात आणताना विजयी संघाचे अभिजीत दोरुगडे व किरण शिर्के चमकले. जानकी रामचंद्र पतसंस्थेने प्रथमपासून आघाडी राखत सचिवालय जिमखाना संघाचा २९-१९ असा पराभव केला. चढाईपटू सुरज डिगे व सुनील कांबळे यांच्या आक्रमक खेळापुढे प्रतिस्पध्र्यांचा प्रतिकार थिटा पडला. सचिवालय जिमखान्याच्या नीलेश चिंदरकरने छान चढाया केल्या. भारत पेट्रोलियम संघाने शैलेश सावंत व जितेश जोशीच्या अप्रतीम खेळामुळे फ्लोरिटेक कबड्डी संघाचा ४३-६ असा सहज पराभव केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages