राज्‍यातील मायक्रो फायनान्‍स कंपन्‍यांची एसआयटी मार्फत चौकशी करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्‍यातील मायक्रो फायनान्‍स कंपन्‍यांची एसआयटी मार्फत चौकशी करणार

Share This
नागपूर, दि. 17
राज्‍यातील सामान्‍य माणसांची फसवणूक करणाऱ्या आणि कर्ज वसुली करताना महिलांचा छळ करणाऱ्या तसेच रिझर्व बॅंकेच्‍या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मायक्रो फायनान्‍स कंपन्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्‍याची मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी केलेली मागणी गृहराज्‍य मंत्री दिपक केसरकर यांनी मान्‍य केली. 
विदर्भातील महिला बचत गटांची विविध मायक्रो फायनान्‍स कंपन्यांकडून फसवणूक होत आहे. तसेच कर्ज वसूली करताना महिलांचा छळ केला जात आहे. नोटाबंदीनंतर या कंपन्या काळा पैसा पांढरा करीत आहेत अशा विविध तक्रारींकडे लक्षवेधीत आमदार डॉ. मिलिंद माने यांनी विधानसभेत लक्षेवधी सूचना उपस्थित केली होती. त्‍यावर बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी राज्‍यातच अशा कंपन्‍यांकडून फसवणूक होत असल्‍याचे सरकारच्‍याही वारंवार लक्षात आले असून या सर्वावर निंर्बंध आण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. या कंपन्‍या सामान्‍य माणसाची फसवूक करीत आहेतच शिवाय त्या रिझर्व बॅंकेच्‍या नियमांची पायमल्‍लीही करीत आहेत. त्‍यामुळे या प्रकरणी एसयाटी नेमूण चौकशी करावी व त्याचा कालबध्‍द अहवाल रिझर्व बॅंकेला सादर करावा अशी मागणी आमदार अॅड आ‍शिष शेलार यांनी केली. ती मान्‍य करीत गृहराज्‍य मंत्री दीपक केसरकर यांनी एसआयटी नियुक्‍त करण्‍यात येईल अशी घोषणा केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages