बेस्टच्या विद्युत् ग्राहकांना परिवहन कर परत करावा लागणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या विद्युत् ग्राहकांना परिवहन कर परत करावा लागणार

Share This
बेस्ट पुढे आर्थिक संकट
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बेस्ट उपक्रमाला सन 2016 पासून परिवहन तूट (टीडीएलआर) घेवू नए असे आदेश दिले आहेत. तरीही 2016 मध्ये एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत बेस्टने परिवहन तूट कर ग्राहकांकडून वसूल केला आहे. कर म्हणून वसूल करण्यात आलेली रक्कम बेस्ट उपक्रमाला ग्राहकांना परत द्यावी लागणार असल्याने आधीच आर्थिक संकटात असलेल्या बेस्टपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहणार आहे.


महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बेस्टला परिवहन तूट कर वसुलीस मनाई केली असली तरी 'व्हिलिंग चार्ज' विज वितरणाचा खर्च वसूल करण्यास अनुमती दिली आहे. भविष्यात टाटाला आपली व्यवस्था वापरण्यास देण्याची वेळ बेस्टवर आल्यास 'व्हिलिंग चार्ज'मुले बेस्टला टाटाकडून विज वितरण खर्च वसूल करता येणार आहे. मात्र महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने बेस्टला विज वितरण खर्चासाठी पर्याय दिला असला तरी बेस्टने याआधी घेतलेले परिवहन तुटीचे पैसे ग्राहकांना कसे परत करणार ? बेस्टला सदर पैसे मार्च 2016 पर्यंत वसूल करण्याची परवानगी असताना त्यानंतरही कुठल्या आधारावर प्रशासनाने ही कर वसूली केली असे प्रश्न समिती सदस्य कॉंग्रेसचे रवि राजा व मनसेचे केदार होंबाळकर यानी सभेत विचारले. बेस्टने परिवहन तुटीच्या नावाने ग्राहकांकडून 3195 कोटी रुपये वसूल केले आहेत हे सर्व पैसे ग्राहकांना परत करावे लागणार आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages