लीज धोरण रोखण्यासाठी बिल्डरांकडून सुपारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2017

लीज धोरण रोखण्यासाठी बिल्डरांकडून सुपारी

आशिष शेलार यांचा शिवसेनेवर आरोप - 
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या २३६ भूखंडाचे लीज धोरण रोखण्यासाठी बिल्डरांकडून सुपारी घेण्यात आली असल्याचा संशय वाटतोय असा आरोप गुरूवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. या भूखंडावर ८० टक्के मराठी माणूस राहतो. त्यामुळे मराठी माणसाच्या पूर्नवसनही रखडणार आहे असेही शेलार म्हणाले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भूखंडाच्या लीज धोरणावरून शिवसेना विरूध्द भाजप असा पुन्हा एकदा सामना रंगला आहे.

सुधार समितीचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांच्या 2015 - 2017 च्या दोन वर्षाच्या कार्यअहवालाचे प्रकाशन महापालिकेच्या पत्रकार कक्षात आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. भूखंडाचे लीज धोरण हे सुधार समितीत मंजूर झाले. मात्र बुधवारच्या महासभेत शिवसेनेने हे धोरण रोखून धरले. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यावर बोलताना शेलार म्हणाले की, सुधार समितीत यांची तोंडे बंद होती, पण सभागृहात त्यांनी शिमगा केला. हा शिमगा कुणाच्या सांगण्यावरून केला ? असे शेलार म्हणाले.

मुंबईत ४ हजार भूखंड आहेत. त्यापैकी २३६ भूखंडाचे लीज संपलेली आहेत. त्या भूखंडावर चाळी, झोपडया, गोडाऊन घर असून त्यामध्ये ८० टक्के मराठी माणूस राहत आहे. लीज धोरण मंजूर झाल्यानंतर पूर्नविकासातून घरे निर्माण होऊ शकतात. मात्र बिल्डरांचे भाव तुटतील या भावनेनेच याला विरोध करण्यात आला आहे. यामुळे मराठी माणसाचे पूर्नवसन होऊ शकले असते. दंड भरून ती संरक्षित करण्याची संधी होती. तसेच मनपाच्या तिजोरीत कोटयावी रूपयाचे उत्पन्न जमा झाले असते. मात्र बालहट्टापायी ८० टक्के मुंबईकरांना दूर नेण्याचे काम केल्याची टीका शेलार यांनी नाव न घेता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर केली. रेसकेार्ससाठीच लीज धोरणाला शिवसेनेने विरोध केला आहे तसेच रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचे आदित्य ठाकरे यांचे स्वप्न आहे. त्यामुळे शेलार यांनी त्यांच्यावर टीका केली.

दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंमत दाखवा असे आवाहन केले होते त्याविषयी शेलार यांना विचारले असता त्यांनी विधानसभेत हिंमत दाखवली आहे असे उत्तर दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती होईल का ? या प्रश्नावर बोलताना, युतीचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतली असे स्पष्ट केलं. भाजपचे खासदार किरीट सोमयया आणि आशिष शेलार हे शिवसेनेविरोधात भूमिका घेताना दिसतात आणि दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उध्दव ठाकरे एका व्यासपीठावर दिसतात याविषयी पत्रकारांनी त्यांना छेडले असता त्यांनी या प्रश्नाला कोणतेही उत्तर न देता बगल दिली

Post Bottom Ad