क्रिकेट आणि सर्व क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय संघात दलित आदिवासी युवकांसाठी आरक्षण ठेवले पाहिजे दलित आदिवासी युवकांमध्ये हि टॅलेंट आहे त्यांना संधी मिळायला हवी टीम इंडियाच्या कॅप्टन पदाचा राजीनामा महेंद्रसिंग धोनी ने दिला आहे त्या जागी विराट कोहली ची निवड करण्याची सूचना आठवलेंनी केली
मुंबई महापालिका निवडणूक लढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून रिपाइंच्या आझाद मैदानातील मध्यवर्ती कार्यलयात सुरु झाल्या त्यास नामदार रामदास आठवले उपस्थित राहिले त्यानंतर पत्रकारपरिषदेस आठवलेंनी संबोधित केले
रिपाइंच्या ईच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दि 9 जानेवारीपर्यंत घेण्यात येतील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज अजूनही रिपाइंकडे येत आहेत. सध्या 125 वोर्डमधील 250 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विविध समाजघटकांच्या लोकांनी उमेदवारी अर्ज रिपाइंकडे दाखल केले आहेत
आगामी सर्व निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मित्रपक्षांनी आम्हाला विचारल्याशीवाय एबी फॉर्म देऊ नये रिपाइं उमेदवारांना मित्र पक्षांचे चिन्ह देऊ नये जे रिपब्लिकन उमेदवार मित्रपक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढतील त्यांना पक्षांतून निलंबित करण्यात येईल असा इशारा नामदार रामदास आठवले यांनी दिला
मुंबई महापालिकेच्या सत्तेत सध्या शिवसेना भाजप आणि आरपीआय अशी महायुती आहे मात्र महापालिकेच्या विविध प्रकल्पाच्या उद्घाटनात रिपब्लिकन पक्षाला डावलले जात आहे पालिका मुख्यालयात प्रबोधनकार ठाकरेंच्या प्रतिमेच्या उद्घाटनास रिपब्लिकन पक्षाला डावलले यावरून नामदार रामदास आठवले यांनी शिवसेनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली दलित पँथरच्या काळात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विरोध केला मात्र नंतर च्या काळात शिवशक्ती भीमशक्ती ची युती करून आपल्यासोबत जयभीम जय महाराष्ट्र चा नारा दिला तसेच प्रबोधनकार ठाकरे यांचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी चांगले संबंध होते त्यामुळे प्रबोधनकारांच्या तैलचित्र उद्घाटनास रिपाइंला निमंत्रित करायला हवे होते अश्या शब्दांत नामदार आठवले यांनी शिवसेनेवर नाराजी व्यक्त केली
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप विरोधात लढले तरीही निवडणुकीनंतर मुंबई वर महायुतीचाच महापौर होईल पहिले महापौरपद किंवा उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावे त्यासाठी आपण दोन्ही मित्र पक्षाच्या प्रमुखांना भेटणार आहोत. निवडणुकीनंतर सेना भाजप ला एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे नामदार आठवले म्हणाले . मुंबईत दोन्ही काँग्रेस पेक्षा भाजप सेना आणि आरपीआयचिच ताकद अधिक आहे येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप आर पी आय अशी युती झाली तर रिपाइंला 30 जागा हव्यात आणि सेनेसोबत युती झाली नाही तर रिपाइंची युती 60 जागा घेऊन भाजप सोबत करण्यात येईल असे नामदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले
दरम्यान आगामी 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप अध्यक्ष अमित शाह यांची आज नामदार रामदास आठवले यांना दूरध्वनीद्वारे चर्चेचे आमंत्रण मिळाले आहे येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकित भाजप आरपीआय युती बाबत अंतिम निर्णयासाठी अमित शाहांशी बैठक होणार आहे रिपब्लिकन पक्ष उत्तर प्रदेश मणिपूर गोवा उत्तरांचल आणि पंजाब या पाचही राज्यात निवडणूक लढणार आहे भाजपशी जेथे युती होईल तेथे युतीतून जेथे होणार नाही तेथे स्वबाळावर लढणार तसेच उत्तर प्रदेशात किमान 250 जागा लढण्याची तय्यारी झाली असल्याचे नामदार रामदास आठवले यांनी आज सांगितले