ऑनलाईन पेमेंट - ग्राहकांना प्रति सिलिंडर पाच रुपयांची सूट देणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑनलाईन पेमेंट - ग्राहकांना प्रति सिलिंडर पाच रुपयांची सूट देणार

Share This
नवी दिल्ली : देशात असलेल्या नकली नोटा आणि काळा पैसा बाळगणार्‍यांना पकडण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने भारतात ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली. त्याचबरोबर देशात कॅशलेस व्यवहारालाही चालना मिळावी, अशीही सरकारची इच्छा आहे. 

देशातील सर्वात मोठय़ा सार्वजनिक कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्या जे ऑनलाईन पेमेंट करतील अशा ग्राहकांना प्रति सिलिंडर पाच रुपयांची सूट देणार आहेत. यापूर्वीही पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर अशा पद्धतीची ऑफर दिलेली आहे. स्वयंपाकाचा गॅस ऑनलाइन पेमेंट केल्यास आता स्वस्त होणार आहे. देशात डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी ही ऑफर दिली जात आहे. सर्वाच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावर पेट्रोल अथवा डिझेलचे डिजिटल माध्यमाने पेमेंट केल्यास ग्राहकांना 0.७५ टक्के सूट दिली जात आहे, ही सूट आम्ही स्वयंपाकाच्या गॅससाठीही लागू करत आहोत, असे सरकारने तेल कंपन्यांना म्हटलेले आहे. ग्राहक सिलिंडरची ऑनलाइन बुकिंग करतेवेळी नेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिटने पेमेंट करू शकतात, अशा प्रकारे पेमेंट करत असताना त्यांना निश्‍चित करण्यात आलेल्या किमतीपेक्षा पाच रुपये (प्रति सिलिंडर) कमीचे पेमेंट करावे लागणार आहे, असे परिपत्रकात म्हटलेले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages