‘एमआरपी’पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या मॉल्स व सिनेमागृहांवर खटले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘एमआरपी’पेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या मॉल्स व सिनेमागृहांवर खटले

Share This
मुंबई, दि. 5 Jan 2017 : एकाच वस्तूच्या दोन किमती छापणे व त्यांची विक्री करणाऱ्या तसेच छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त किमतीने पॅकबंद पाणी बाटली व शीतपेयांची विक्री करणाऱ्या मुंबई व ठाण्यातील 17 मॉल्स व सिनेमागृहांवर वैधमापन शास्त्र यंत्रणेने कारवाई करून18 खटले दाखल केले आहेत. छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास त्याची तक्रार वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, असे यंत्रणेने कळविले आहे. 
पॅकबंद वस्तूंची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे व एकाच वस्तूच्या दोन किमती छापून त्याची विक्री करण्याच्या तक्रारींवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांना दिले होते. त्यानंतर गुप्ता यांनी मुंबई ग्राहक पंचायतीचे शिरीष देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मुंबई व ठाणे येथील विविध 17 मॉल्स व सिनेमागृहांमधील दुकानांची तपासणी केली. यामध्ये मुंबईतील आयनॉक्स सीआर 2, सबवे हायपर सिटी, इन्फिनिटी मॉल, बिग सिनेमा, इनॉर्बिट मॉल, हब मॉल या मॉल्सचा व मुव्ही टाईम्स मल्टिफ्लेक्स, सिनेमॅक्स, अनुपम चित्रमंदिर या सिनेमागृहांचा समावेश आहे. तर ठाण्यातील विवाना मॉलचा यामध्ये समावेश आहे.

या कारवाईमध्ये एकाच पॅकबंद वस्तूंवर दोन किंमती छापल्याबद्दल 15 खटले, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याबद्दल 2तर इतर नियमांच्या उल्लंघनाबद्दल 1 असे एकूण 18 खटले दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने किनले, ॲक्वाफिना,हिमालया या ब्रँडचे पाणी बॉटल, तसेच रेड बूल, मिरिंडा, फँटा, पेप्सी व फ्रुटी या शितपेयांचा समावेश आहे.

तक्रारींसाठी संपर्कयाबाबत तक्रार असल्यास वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmmumbai@yahoo.indyclmkokan@yahoo.in, dyclmnashik@yahoo.com, dyclmpune@yahoo.indyclmaurangabad@yahoo.in, dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages