वक्फ मालमत्तांच्या दुस-या सर्वेक्षणास आरंभ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वक्फ मालमत्तांच्या दुस-या सर्वेक्षणास आरंभ

Share This
मुंबई, दि. 5 Jan 2017 : महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्तांचे दुस-या सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. पथदर्शी सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी दि. 12 जानेवारी 2016 रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख कार्यालयात प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.
वक्फ मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण यासंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी आज त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, संभाजी कडू-पाटील, परभणी व पुणे जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद उपस्थित होते.

वक्फ अधिनियमातील उपरोक्त तरतुदीस अनुसरुन महाराष्ट्र शासनाने दि. ६ डिसेंबर २०१६ रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिध्द करुन, महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्तांचे दुसरे सर्वेक्षण करण्यासाठी जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमि अभिलेख, महाराष्ट्र राज्य,पुणे यांची औकाफचे सर्व्हेक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती, त्यानुसारच हे सर्वेक्षण होत आहे. या दुसऱ्या सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांची त्यांच्या संबंधित जिल्ह्यासाठी औकाफचे अतिरिक्त सर्वेक्षण आयुक्त म्हणून व राज्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार यांची त्यांच्या संबंधित तालुक्यांसाठी सहायक सर्वेक्षण आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages