मुंबई दि 2 Jan 2017 -- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील खरा राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे. बहुजन समाज पक्ष नाही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माला आणि रिपब्लिकन संकल्पनेला तीलांजली देणाऱ्या मायावती या कधीही आंबेडकरवादी होऊ शकत नाही असा भीमटोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बसपाप्रमुख मायावती यांना लगावला
लखनौ येथील बिजली पासी किल्ला मैदान येथे रिपब्लिकन पक्षाच्या जाहीर सभेस नामदार आठवले प्रमुख मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते
यावेळी बहुजन समाज पक्षाचा त्याग करून अनेक मान्यवरांनी शेकडो समर्थकांसह रिपब्लिकन पक्षात जाहीर प्रवेश केला त्यामध्ये आग्रा येथील बसपा नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मंत्री अजयसिंग गौतम; माजी मंत्री राकेश मौर्या; हाथरस लोकसभा क्षेत्र च्या बसपा अध्यक्ष सारिका बहेल आणि लखनौ चे एडवोकेट अरविंद कुशवाहा यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह बसपा सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मोहनलाल पाटील उत्तर प्रदेशअध्यक्ष सत्यनारायण तसेच राष्ट्रीय सचिव प्रभारी डॉ आर आर मौर्य प्रदेश उपाध्यक्ष जवाहरलाल राजा बक्ष जगजीवन प्रसाद आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणार रिपब्लिकन पक्षाला पुनर्जीवित करण्यासाठी आपला प्रयत्न सुरु आहे उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरत आहे असे सांगत डॉ बाबासाहेबांच्या खऱ्या पक्षाला रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा द्या असे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले
No comments:
Post a Comment