निसर्गाशी संघर्ष करत माणदेशी महिला उद्योजकांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

निसर्गाशी संघर्ष करत माणदेशी महिला उद्योजकांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली

Share This
मुंबई, दि. 5 Jan 2017 : माणचा भाग म्हणजे पाण्याचे दुर्भिक्ष, नेहमीच दुष्काळ, या भागाला निसर्गाची साथ नाही. अशा भागातही निसर्गाशी संघर्ष करत या संघर्षातून आपला गाव व गावातील उद्योग पुढे नेण्याची जिद्द येथील महिलांची आहे. माणदेशी फांउडेशनने या जिद्‌दी महिलांना साथ देऊन आणि त्या महिलांमधील कौशल्य ओळखून त्यांच्या व्यवसायाला मुंबईत आणले आणि या माणला नवीन ओळख करुन दिली.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा समजल्या जाणाऱ्या माण भागातील महिलांनी पुढाकार घेऊन उभारलेल्या म्हसवड येथील माणदेशी फांउडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिध्द सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण उद्योजक स्त्रियांचा महोत्सव समजल्या जाणाऱ्या या माणदेशी महोत्सवामध्ये माणदेशी महिलांनी तयार केलेल्या मालाचे प्रदर्शन या महोत्सवात मांडण्यात आलेले आहेत. माणदेशी फांउडेशनच्यावतीने मुंबईत प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव 8 जानेवारी पर्यंत रविंद्र नाट्य मंदिर येथे सुरु राहणार आहे. या महोत्सवात माण देशासारख्या ग्रामीण भागातील कला, क्रीडा, संगीत व खाद्यपदार्थंसह अन्य विशेष गोष्‍टी मांडण्यात आल्या आहेत.

श्री. तावडे म्हणाले की, निसर्गाची साथ नसताना संघर्ष करणाऱ्या या महिलांनी आपल्या व्यवसायाची आणि कौशल्याचे व्यासपीठ मुंबईत आयोजित करुन मुंबईला एक चांगले उदाहरण घालून दिले आहे.

याप्रसंगी सिनेदिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची भाषणे झाली. माणदेशी फांउडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी प्रास्ताविक केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages