मुंबई, दि. 9 : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध व्यवसायावर अंकुश ठेवून अधिकृतरित्या होणाऱ्या मद्य विक्रीतून महसूल वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या सर्व प्रक्रियेला गती देण्यासाठी या विभागात बदल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून हा विभाग लवकरच अत्याधुनिक पध्दतीने ऑनलाईन करण्यात येणार आहे, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे सांगितले.
विधानभवनाच्या वाहनतळ येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ४६ नवीन वाहनांचे उद्घाटन आणि हस्तांतरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री विजय देशमुख, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, आयुक्त व्ही. राधा संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, या विभागात वाहनांची संख्या कमी असल्यामुळे कामावर ताण येत होता. विभागातील कामकाजाला गती येण्यासाठी बदलाचा प्रस्ताव ही तयार करण्यात आला आहे. जनतेला अवैध धंद्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला देता यावी म्हणून टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३ आणि व्हाट्स अॅप क्रमांक ८४२२००११३३ तसेच मोबाईल ॲप सुविधा सुरू केली आहे. भरारी पथकाच्या वाहनांना जीपीएस किट बसविण्यात आले आहे. व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीमद्वारे (Vehicle Tracking System) वाहनांचे नियंत्रण केले जाते. त्यामुळे अवैध व्यवसायांवर कारवाई समन्वयाने आणि प्रभावीपणे करण्यास मदत होत आहे.
हा विभाग ऑनलाईन करून सोशल मिडियाचाही वापर करण्यात येणार आहे असे सांगून बावनकुळे पुढे म्हणाले की, या विभागात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी पुरस्कार सुरू करावेत आणि त्यांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे.
सुधीर श्रीवास्तव म्हणाले की, हा सोहळा छोटा असला तरी या नवीन वाहनांच्या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क विभागाला काम करण्यासाठी नक्कीच अधिक गती येईल. या विभागात अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत त्यामध्ये टोल फ्री क्रमांक, व्हॅाट्स अप क्रमांक ही देण्यात आला आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर वचक ठेवण्यात यश आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. टाटा मोटर्सचे अधिकारी नूर यांनी प्रतिनिधिक स्वरूपात मंत्री बावनकुळे यांच्याकडे चावी सुपूर्द करण्यात आली. बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ही वाहने बाहेर काढण्यात आली. यामध्ये टाटा झेस्ट मॅाडेलच्या १२कार व टाटा सुमो गोल्ड मॅाडेलच्या ३४ जीप अशी एकूण ४६ वाहने हस्तांतरित करण्यात आली.