प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छूक संस्था / व्यवस्थापनाने अर्ज करण्याचे आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छूक संस्था / व्यवस्थापनाने अर्ज करण्याचे आवाहन

Share This
मुंबई, दि. 4 Jan 2017 : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी इच्छुक संस्थांकडून/ व्यवस्थापनाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दिनांक 16 जानेवारी 2017 पर्यंत नियमित शुल्कासह आणि दिनांक 17 जानेवारी 2017 ते दिनांक 31 जानेवारी 2017 पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी आहे. 
या संबंधित अर्ज व माहितीपुस्तिका मंडळाचे संकेतस्थळ www.msbve.gov.in येथे उपलब्ध असून इच्छूक संस्थांनी संकेत स्थळावरुन सन 2017-18 साठी प्रसिध्द केलेल्या माहितीपुस्तिकेमधून आवश्यक परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, चलन रक्कम इत्यादी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय यांच्याकडे जमा करावयाचे आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, 49,खेरवाडी, अलियावर जंग मार्ग,वांद्रे पूर्व, मुंबई 51 येथे संपर्क साधावा अथवा मंडळाचे www.msbve.gov.in पहावे असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages