मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे थोर युगपुरुष‘प्रबोधनकार’ केशव सीताराम ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सोमवार, दिनांक २ जानेवारी, २०१७ रोजी दुपारी १.१५ वाजता महानगरपालिका सभागृह, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे.
या समारंभास महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम; उद्योग, खनिकर्म मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या उप महापौर अलका केरकर, महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार राज पुरोहित, आमदार भाई जगताप, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिकेतील सर्व विविध पक्षीय गटनेते, विविध वैधानिक व विशेष समित्यांचे अध्यक्ष यांच्यासह ए, बी व ई प्रभाग समितीच्या अध्यक्षा शहाना रिझवान खान, स्थानिक नगरसेवक गणेश सानप, सर्व अतिरिक्त महापालिका आयुक्त, सर्व नगरसेवक / सर्व नगरसेविका, सर्व नामनिर्देशित नगरसेवक / नगरसेविका यांनाही सन्माननीय अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
या समारंभाप्रसंगी महापालिकेच्यावतीने इतर उपक्रमांचेही लोकार्पण करण्यात येणार आहे. दुकाने व आस्थापना खात्याच्या ऑनलाईन नोंदणी व नूतनीकरण संगणकीय प्रणालीचे लोकार्पण, शिक्षण खात्याच्यावतीने प्राथमिक शाळांना पूर्वपरवानगी, प्रथम मान्यता आणि मान्यता मुदतवाढ प्रस्ताव ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण, महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणाऱया सॅनिटेरी नॅपकीन व्हेंडींग मशिनचे लोकार्पण, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने निर्मित नवीन व अद्ययावत महापालिका माहिती संकेतस्थळाचे लोकार्पण आणि अग्निशमन दलाच्यावतीने निर्मित ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात येणार आहे. समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन यांनी केले आहे.