विद्यार्थी भारती संघटनेच्या मुलींनी केले शॉर्ट ड्रेस घालून आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2017

विद्यार्थी भारती संघटनेच्या मुलींनी केले शॉर्ट ड्रेस घालून आंदोलन

मुंबई January 20, 2017 - मुलींच्या शिक्षणासाठी देशभरात ख्याती असलेल्या श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठाच्या ६६ व्या महोत्सवी दीक्षांत सोहळ्याला विद्यार्थी संघटनेने केलेल्या फॉर्मल ड्रेस कोडविरोधातील आंदोलनाचे गालबोट लागले. विद्यापीठाने नुकतेच मुलींना विद्यापीठाच्या परिसरात केवळ फॉर्मल डेÑसच घालून येण्याचे तुघलकी फर्मान जारी केले होते, त्याचे तीव्र पडसाद विद्यापीठातील मुलींसोबतच समाजातही उमटले होते. त्यापार्श्वभूमीवर विद्यार्थी भारती संघटनेने विद्यापीठाच्या या फर्मानाविरोधात शुक्रवारी आंदोलन करून आपला राग व्यक्त केला.
एसएनडीटी विद्यापीठाच्या स्थापनेला १०० वर्षे यंदा झाली असून यंदाच्या या दीक्षांत सोहळयात ११, ८४४ विद्यार्थिनींना पदवी व पदविका प्रदान करण्यात आल्या. तर गुजरात मधील अहमदाबाद येथील डॉ. अरुणा वणीकर यांना त्यांच्या ‘रेनल आणि ट्रान्सप्लाटं पॅथॉलॉजी’ या क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल सन्माननीय डी. लिट्ही पदवी प्रदान करण्यात आली. तसेच या समारंभात १२ अभ्यासक्रमांतील एकूण १७९ पदवी व पदविकांचा समावेश होता. या वर्षी प्रथमच मास्टर आॅफ व्हिज्युअल आर्ट विथ पोर्टेज्चर, बॅचलर आॅफ कॉमर्स विथ अकौन्टन्सी अ‍ॅड फायनान्स, बॅचलर अ‍ॅड मास्टर आॅफ स्पेशल एज्युकेशन इन मेंटल रिटार्डेषन अ‍ॅन्ड इन्टेलेक्च्युअल डिसेबिलीटी आणि बॅचलर आॅफ टेक्नॉलॉजी विथ इलटे जॅनिक्स इंजीनीयरींग या पदव्याही प्रदान करण्यात आल्या. त्यामध्ये पदव्युत्तर व पीएच. डी. या पदव्यांचाही समावेश होता. या समारंभात एकूण ४७ विद्यार्थिनींना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. हा पदवीदान सोहळा विद्यापीइाच्या सर सिताराम तथा लेडी शांताबाई पाटकर दीक्षांत सभागृह, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आला होता. या पदवीदान सोहळयात राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव यानी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. तर मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीष (सेवानिवृत्त) चंद्रशेखर धर्माधिकारी हे प्रमुख पाहुणे हाते एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी यांनी विद्यापीठाचा दीक्षान्त अहवाल सादर केला.

दरम्यान, महिलांच्या सक्षमीकरणासाठी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केलेले विद्यापीठ हे विश्वविद्यालय असून या विश्वरुपी विद्यालयातून शिक्षकांनी जात, धर्म भेदभाव न ठेवता राष्ट्रीय भावना व एकात्मता जोपासण्याचे कार्य करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधिश चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले. तर विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी यांनी प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या देशात स्त्रियांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी या विद्यापीठाचा मोलाचा वाटा असून विद्यार्थींनींनी आपल्या शिक्षणाचा उपयोग देशाच्या हितासाठी करावा असे आवाहन केले.

Post Bottom Ad