मुंबई, दि. 4 Jan 2017 : राज्यातील कौशल्य विकास व्यवसाय प्रशिक्षणास चालना देऊन ग्रामीण भागातील तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्याना रोजगारक्षम बनविण्यासाठी पुढील काळात कौशल्य विकास विभागाच्या पध्दती अद्ययावत करणार असल्याचे कौशल्य विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालय येथील दालनात कौशल्य विकास विभागासंदर्भात करावयाच्या उपाययोजना तसेच यातील अडचणी संदर्भात आढावा बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विजय वाघमारे,आयटीआय निर्देशक संघटनेचे पदाधिकारी तसेच राज्यातील कौशल्य विकास विभागातील अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील ग्रामीण भागातील त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण उपलब्ध करून देवून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येईल. त्यासाठी दर्जेदार कौशल्य विकास प्रशिक्षण पद्धती निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न करीत आहोत, असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील आयटीआय सुसज्ज व अत्याधुनिक तसेच सर्वोत्तम करण्यासाठी विद्यार्थ्यांना वसतिगृह भोजन व्यवस्था तसेच इतर सुविधा पुरविण्यासाठी उद्योगांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या ( सीएसआर) माध्यमातून सहभागी व्हावे, यासाठी व्यक्तिश: प्रयत्न करणार आहे. बदलत्या काळानुरूप आवश्यक मागणीनुसार रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तयार करण्याच्या सुचनाही यावेळी डॉ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण उपलब्ध करण्यासाठी आवश्यक कच्चा माल, तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री पुरविण्यासाठी पाठपुरावाही करणार आहे. रोजगारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी तासिका तत्वावरील निर्देशकांबाबत मानधन वाढीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सुचना देत त्यांनी केंद्र शासनाच्या धर्तीवर पदांचा आढावा पूर्ण करून ‘क’ व ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.